Monday, February 23, 2009

॥ सल ॥

.

काळजात दुःख
पोटात भुख
किती हलवू हाथपाय
कपाळी कोरडेच सुख॥

आतडयाना गाठ
दुर्दैव सोडिना पाठ
खाच खळ्ग्यांचे आयुष्य
हातावरच्या रेषाही सपाट॥

फुल घेता टुचे काटा
जीवनाच्या नागमोडी वाटा
आयुष्याच्या किनारी
केवळ अपयशाच्या लाटा॥

आभाळाच रीकामपण
मनी आठवणींच खूपणं
पोर्णिमेच्या चांदराती
माझ माझ्यात जळणं॥

माझा भुईला या भार
वरून तुझा नकार
झाली सरणाची तयारी
जीवनावर म्रॄत्युचा उपकार॥

.

||ह्रुदयी अजूनी माझ्या, तुझा ओलाच घाव आहे ||

.

येथे माणूसकी विकली जाते, प्रत्येकाचा ठरलेलाच भाव आहे
एकाच वस्तीतूनी, प्रत्येकाचा वेगळाच गाव आहे॥१॥

घेऊनी तिचे नाव, आजन्म मुका जाहलो मी
म्हने ओठी तिच्या आता, दुसरेच नाव आहे॥२॥

नको देऊस जखम नवी, मज सोसवे न आता
ह्रुदयी अजूनी माझ्या, तुझा ओलाच घाव आहे॥३॥

एकदाच येऊनी, सये पाहून जा
तुझवीण संसाराचा, अर्धाच डाव आहे॥४॥

राजाचा रंक जाहलो, भुलली दुनिया मलाही
वेडया मनास तरीही, तव प्रितीचीच हाव आहे॥५॥

.

!!!!! शेवटचे गीत !!!!!

.

जिवनावरचे पांघरूण
दूर सारायचे होते
डोळे भरून आले
तरी थोडे हसायचे होते ॥

घेण्या मोकळा श्वास
पसरविले होते हात
छाटताना सजनी एकदा
तुझ्या गळा भेटु द्यायचे होते ॥

तुझ्या प्रत्येक वाटेवरचे
मी वेचिले होते काटे
तोल जात होता माझा
पडताना,तु सावरायचे होते ॥

मी निर्मिले होते सजनी
आपल्या स्वप्नातील घरटे
तु ओलांडताना उंबरठा
क्षणभर,स्वतःला विचारायचे होते ॥

तु नव्हतीस माझ्या
अन मी तुझ्या बंधनात
बंधनातीत नाते तरीही
तुज तोडायचे होते ॥

मागीतली न होती मी
म्रृत्यू नंतर ही तुझी साथ
अखेरच्या क्षणी मात्र
तु जवळ असायचे होते ॥

मजसी न कोणती आशा
न हा उद्योग उत्तरांसाठी
मनातील दुःख माझे
शब्दात मांडायचे होते ॥

.

अवकाश बराच आहे !!!

.

डोळ्यात वाट जागी,आभास उगाच आहे
तु येण्यास अजूनी, अवकाश बराच आहे !!

नभ दाटले असे का, झाली आभाळी घालमेल
येण्या मोसम पावसाचा, अवकाश बराच आहे !!

झाकू नकोस सजनी, तुझ्या चंदेरी मुखास
अजुनी पहाट होण्या, अवकाश बराच आहे !!

आहे उभा तसाच, दारात मृत्यु माझ्या
तुझि मिठी सैल होण्या, अवकाश बराच आहे !!

खेळ जिवनाचा मांडलेला, आव्हान तसेच जागे
तुझ्या पराजयास 'नितिज', अवकाश बराच आहे !!


.

||मिलन||

आभाळात दाटलेले ढग, बस मधुन दिसनारे डोंगर अन त्या डोंगरा जवळून जाणारे ढग जणू काही धरणी बरोबर मिलनास आतुर आहेत अस वाटत अन
मग मधेच पावसाची एक सर. हे सगळ बस मधून पाहिल ते मागच्या शुक्रवारी कोल्हपुरहून पूण्याला जाताना. त्या प्रवासात सुचलेली ही कविता.......


आभाळी नभ दाटलेले
खाली वाढे धरणीची प्यास
दोघ मिलनाला आतुर
सोसवेना विरह दोघास॥१॥

वारा भारीच खटयाळ
नभा आणी धरणी जवळ
क्षणी पालटे बदमाश
पुन्हा नेइ दूर दूर॥२॥

सुर्य राजा कसा चोर
गमंत पाहि वरून
धरणीची घालमेल
पाहि नभाच्या आडून॥३॥

दोघांचे मिलन ठरलेले
एक नशिब दोघांचे
धो धो बरसे नभ
काही चालेना कूणाचे॥४॥

रीता परी समाधानी
झाला नभ बरसून
तॄप्त झाली धरणी वेडी
जलरूपी प्रेम पिऊन॥५॥

नभा म्हणे प्रेमबाला
पून्हा कधि रे मिलन
दोन क्षणांचा विरह राणी
वाट पहा हिरवा शालू लेऊन॥६॥