Sunday, December 16, 2007

|| अपूर्णतेचा त्याला आरंभीच शाप आहे ॥

.
जीवन अता माझे, मरणा जवळी आले
मी हा जो बोललो, शेवटचाच आलाप आहे ॥


ठेऊ नकोस ऊराशी, कधी प्रेमास माझ्या
अपूर्णतेचा त्याला, आरंभीच शाप आहे ॥


केले जगाने आजवरी, सारेच पुण्य होते
माझेच फक्त कर्म, नेहमीच पाप आहे ॥


तु विसरलीस मजला, झाली कित्येक वर्षे
ओठी तरीही माझ्या, तुझ्याच नावाचा जाप आहे ॥


ऎसी कोणत्या प्रकारे, करीशी मोजदाद
देवा तुझ्याकडेही, मापात पाप आहे ॥

.....नितिज
.

!! आई !!


.
आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न सहावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

.....नितिज
.

" विरह.......!!!!! "


.
आज तुझा विरह
मन माझे मोडुन गेला
शब्द ही ना बोललीस तू
मुकेपणा ह्रुदय तोडुन गेला !

न जाणो मी आज चुकलो कुठे
तु सोडुन, प्रत्येक माझ्याशी बोलून गेला
मी प्राशिला ना दवबिंदु एकही
मैत्रीचा ओलावा तरी कैसा सुकून गेला !

उद्या परत बोलशील तू
म्हणुन उद्याची मी वाट पाहे
दोन दिवसात विसरायच नाही
अशी आपल्या मैत्रीची अट आहे !

.....नितिज
.

" विश्वास !!! "


.

जग सारेच अनोळखी
माणसे सगळीच सारखी
सांग कसा विश्वास ठेऊ
ईथे कुणी न त्याचा पारखी !!

क्षण असे हे आयुष्याचे
बस एकटेच जगायचे
येथे प्रत्येकाचा चेहरा फ़सवा
कुणावर कसे विश्वासायचे !!

पण् मित्रा, कुणि विश्वास् दाखवला तर तोडायचा नाही
सगळे सारखेच म्हणुन त्याला सोडायच नाही
अविश्वासाला विश्वासाने जिंकायच
जिवनाच्या फ़ुलाला विश्वासाने फ़ुलवायच !!

.....नितिज
.

" रंग मज देऊन गेली !!!!! "



.

बेरंग माझ्या जिवनी येऊन गेली
ती मोसमी रंग मज देऊन गेली !

सारया बंधनातुन मुक्त माझ्या मनाशी
जन्मोजन्मीचे नाते जणु ती जोडुन गेली !

मी आतुन शुन्य,एक पोकळी होतो
मज बासरी समजुन ती छेडुन गेली !

आठवणींचा पाऊस दिवसभर रोखीला मी
स्वप्न बनुनी रात्री ती बरसुन् गेली !

वाट सारी सोबतीत चाललो आम्ही
वळनवर ती मज अनोळखीसे पाहुन गेली !

बाळगुन होतो ऊराशी सागराला
डोळ्यातुन नदी कैसी मग वाहुन गेली !

बरसुन तॄप्त मोकळे आकाश झाले
धरती वेडी तरी कोरडीच राहुन गेली !

.....नितिज
.

माझे जिवन जणु कोरे पान....!


.

आता पुर्वी सारखा मी लिहीत नाही
कारण आता लिहितांना तु जवळ असत नाही !
आता माझेच शब्द माझ्याशी फ़ितुर होतात
तुझ्या विरहाची जाणिव करुनदेण्यासाठी जणु आतुर होतात !!

पुर्वी तु जवळ असतांना मी खुप लिहायचो
तुझ्या डोळ्यातील स्वप्नांना कागदावर उतरवायचो !
आता डोळे बंद करुनहि काहिच सुचत नाही
कारण आता सुचन्यासाठी तु जवळ असत नाही !!

पुर्वी तुझ्या ओठातुन शब्दांची बरसात व्हायची
तुझ्या शब्दांच्या बरसातीत माझी कविता जणु न्हायची !
आता चिंब भिजवणारया पावसातही शब्द बरसत नाही
कारण आता शब्द बरसण्यासाठी तु जवळ असत नाही !!

तुझी वाट पाहुन डोळे आता थकुन जातात
आता शब्द नाहि माझे अश्रुच् फ़क्त कागदावर उमटुन जातात !
आता फ़क्त उरले आहे तु दिलेले शब्दांचे दान
तुझ्या शब्दांविना माझे जिवन जणु कोरे पान !!

.....नितिज
.

" अपवाद.....!!!!! "



.

तसा एकटाच होतो आहे तुझाच ध्यास
गळा दाटुन आला तु घातली आर्त साद !

कश्याला चौकशी अता या एकटया जीवाची
एवढेच सांग तु आहेस् ना आंनदात !

फुलपाखरे सांगतात फुलल्या सर्व बागा
एवढेच रान माझे आहे ना उजाड !

पहाटे नित्य स्वप्नात येतेस तुच राणी
तुला पहाण्याचा मला आहे ना नित्य नाद !

तुझ्याशी प्रत्येकाचे स्पष्ट झाले ना गं नाते
माझ्याच नात्याविषयी आहे ना हा वाद !

तुला मिळवण्यासाठी सर्व किती करतात प्रयास
सखे माझाच गं त्यासी आहे ना अपवाद !

.....नितिज

.

Saturday, December 15, 2007

तुझी...आठवण....!!!!!


.

मावळत्या सुर्याला न्याहाळतांना

आकाशी चंद्र येण्याची वाट पाहतांना

अन् चंद्राने चोरुन चांदणीला बघतांना

तुझी खुप आठवण येते !!



पहिल्या पावसात एकटयाने चिंब भिजतांना

ओल्या मातीचा सुगंध श्वासात भरतांना

तुझ्यासाठी वेचलेल्या गारांना एकटयानेच खातांना

तुझी खुप आठवण येते !!



संध्याकाळी नदीकिनारी एकटाच फिरतांना

त्याच नावेतुन तुझ्याशिवाय पलिकडेजातांना

नदिच्या शांत पाण्याने तुझ्याबद्दल विचारतांना

तुझी खुप आठवण येते !!



तु दिलले मोरपिस अजुन जपतांना

पिंपळाच्या पानाची जाळी होतांना

तुझ्या केसात माळलेल्या गुलाबांचा वास घेतांना

तुझी खुप आठवण येते !!



सकाळी उठल्यावर सवयीप्रमाणे तुझा फोटो पाहतांना

आरश्यासमोर माझा मलाच न ओळखतांना

तुझ्यात नेहमी मला शोधतांना

तुझी खुप आठवण येते !!

.....नितिज
.