
.
आता पुर्वी सारखा मी लिहीत नाही
कारण आता लिहितांना तु जवळ असत नाही !
आता माझेच शब्द माझ्याशी फ़ितुर होतात
तुझ्या विरहाची जाणिव करुनदेण्यासाठी जणु आतुर होतात !!
पुर्वी तु जवळ असतांना मी खुप लिहायचो
तुझ्या डोळ्यातील स्वप्नांना कागदावर उतरवायचो !
आता डोळे बंद करुनहि काहिच सुचत नाही
कारण आता सुचन्यासाठी तु जवळ असत नाही !!
पुर्वी तुझ्या ओठातुन शब्दांची बरसात व्हायची
तुझ्या शब्दांच्या बरसातीत माझी कविता जणु न्हायची !
आता चिंब भिजवणारया पावसातही शब्द बरसत नाही
कारण आता शब्द बरसण्यासाठी तु जवळ असत नाही !!
तुझी वाट पाहुन डोळे आता थकुन जातात
आता शब्द नाहि माझे अश्रुच् फ़क्त कागदावर उमटुन जातात !
आता फ़क्त उरले आहे तु दिलेले शब्दांचे दान
तुझ्या शब्दांविना माझे जिवन जणु कोरे पान !!
.....नितिज
.
No comments:
Post a Comment